Home महाराष्ट्र संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस

संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना, अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौरा लवकरच असणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

अयोध्येचा दौरा कोणीही करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहे. त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि कोणाला कुठे जायचं हा त्याचा अधिकार आहे. त्यात गैर वाटण्याचे कारण नाही. कारण, प्रभू श्रीरामाचे भव्य असे मंदिर त्या बांधले जात आहे. त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामाची दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे., असं फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

यावेळी बोलताना फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून बोलताना राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावरूनही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत हे सध्या नैराश्येत आले आहेत. कधी भाजपवर तर कधी राज ठाकरेंच्याबाबत बोलत असतात. राज ठाकरेंनी हिंदुत्वाला जवळ केल्याचे बघून ते अधिकच निराश झाले आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात, कितीवेळा आम्ही उत्तरं द्यायची. आम्हाला कामधंदे आहेत, त्यांना नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा जोरदार टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

‘नवहिंदू ओवैसी म्हणणाऱ्या संजय राऊतांना, राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात पलायन करावे; नाना पटोलेंचा टोला