आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जम्मू काश्मीरमधील सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून तीन दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमित शहा यांनी काही दिवस तिकडेच राहावे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केली. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्युत्तर दिलंय.
हे ही वाचा : वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा टोला
संजय राऊत यांना अजूनही हिंदुत्व कळलेले नाही. म्हणून त्यांना शिकवायची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. अमित शहा किमान काश्मीरला जातात. संजय राऊत यांनी एकदा तरी तिथे जाऊन दाखवावे. यांची काय किंमत आहे. यांचे राज्यात सरकार असून ते काय करत आहेत. आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. आपले कर्तव्य काय आहेत याची आधी माहिती घ्यावी. अडीच वर्षे झाली यांना एबीसीडी कळलेली नाही. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांनी सांगितलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी व्हावी”
वसईत शिवसेनेला मोठे खिंडार; 150 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण