रामदास आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपद कसं मिळेल हे पाहावं, शिवसेनेचं टेन्शन घेऊ नये- संजय राऊत

0
197

नवी दिल्ली : भाजपला तीन वर्ष मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याच्या फाॅर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी राऊत तयार झाले आहेत, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. यावर शिवसेनचे नेते संजय राऊत यांनी मत व्यक्त करत आठवलेंना टोला लगावल आहे.

रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद कसं मिळेल हे पाहावं. आठवलेंनी शिवसेनेचं टेन्शन घेऊ नये, असं म्हणत संजय राऊत यांनी आठवलेंनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, NDA मधून बाहेर काढल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीकाही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here