“…तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते”

0
173

मुंबई : राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी, महाराष्ट्रात त्याची गरज नाही. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असं बोलणार्‍यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. जर कोरोनाचे संकट नसते तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवन घालता आले असते, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधी पक्षाचे सध्या 105 चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत, पण सरकारचे 170 आहेत, त्याचे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये, असा इशाराही संजय राऊत यांनी अग्रलेखातून दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांची इच्छा असेल तरच महाविकास आघाडीचं सरकार पडेल”

…मग कळेल रस्त्यावर कोण; नारायण राणेंवर केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्यृत्तर

फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं- नितीन राऊत

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here