मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या शपथविधीवेळी घडलेल्या प्रसंगावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवाजी महाराजांच्या वर का, असा सवाल भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजेंनाच प्रतिप्रश्न केला.
बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा विषय नाही, विषय आहे जय शिवाजी, जय भवानीचा, त्यावरच बोलू, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी उदयनराजे यांना केला.
दरम्यान, महाराजांच्या नावे कुणीही राजकारण करु नये, उदयनराजे भोसले तेच बोलले, त्यांनी काही चुकीचं म्हटलं नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”
“नितीन राऊत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता”
व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही- उदयनराजे भोसले
दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला