संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट; राजकीय चर्चेला उधाण

0
191

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं समजतं आहे. तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. टीव्ही 9 मराठीने या संदर्भातले वृत्त दिलं आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारलं असता तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…

बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत

“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”

“अभिनेत्री दीपिका पादुकोणपाठोपाठ आता श्रद्धा कपूरही चाैकशीसीठी एनसीबी कार्यालयात दाखल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here