स्वबळावरच मैदानात’ – संजयकाका पाटील यांचा नवा ट्विस्ट

0
650

सांगली | प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे सांगलीतील राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करत संजयकाका पाटील आणि पद्माकर जगदाळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली असून 33 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. “नंबर वन आम्हीच राहू,” असा ठाम दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. सध्या पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

पद्माकर जगदाळे यांनीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असल्याचा दावा केला. अनेक प्रभागांमध्ये पक्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

33 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महापालिका निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, इतर पक्षांच्या गोटातही हालचाल वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here