Home महाराष्ट्र नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100...

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100 टक्के निकाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यातील 50 ते 60 शाळांमधून विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते.

ही स्पर्धा पुणे येथे मास्टर माईंड ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये सांगलीतील ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीचा शंभर टक्के निकाल लागला.

सांगलीच्या समर्थ जगदाळे, वेदांत आनंदे, अमेय पाटणकर, या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मिळाले तर , ध्रुव खांडेकर, आरोही जाधव, आदित्य भोई, आर्याही कोरे, आर्यन जगदाळे, आराध्या पाटील,उर्वी जामदार, अनुष्का करमरकर, रिचा टिकारे, रुद्र कोळी, स्नेहल बाबर, सृष्टी अडसुळे,परिणीती हरगुडे, दर्पित ताटे यांना प्रथम क्रमांक आणि  स्तवन तळसंदेकर, इकरामुल्ला महात, आमयू डोंगरे, पिनाक नलावडे, जयवर्धन पतंगे, सर्वज्ञ घाडगे, विराट कोळी, सिद्धांत आनंदे, यांना द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक नमन खाडे याने मिळवला. तर  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहेत.

ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडे राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी स्वतः केला खुलासा, म्हणाले…

दरम्यान, स्पर्धेचा बक्षीस समारंभ वितरण सोहळा फिरोज सर व कांचन मुच्चल यांच्या हस्ते संपन्न झाला. या विद्यार्थ्यांना ब्रेन बूस्टर अकॅडमीतील आफरीन रंगरेज मॅडम व श्वेता शिकलगार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

“वंदे भारत चक्क रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पोहचली कल्याणला”

रामदास आठवले महायुतीवर नाराज? म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते…”