सांगली : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. देशात आणि राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील हातावर पोट असणाऱ्यांच्या जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच सांगली पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 600 मजुरांच्या जेवण, नाष्ट्याची तसेच राहण्याची देखील सोय केली आहे.
संचारबंदीच्या काळात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून फटके देण्याचं काम केलं जात आहे, त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहेत, अशातच सांगली पोलिसांनी हे कौतुकास्पद काम केलं आहे.
दरम्यान, सांगली पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या चांगलंच कौतुक होताना पहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
रामदास आठवलेंनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक; म्हणाले…
पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराकडून 1 कोटींची मदत
या संकटाच्या काळात राज सुद्धा मला सातत्यानं फोन करतोय- उद्धव ठाकरे
कोरोना ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा राज्यसरकारचा निर्णय- अजित पवार