सांगलीत कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या; धारधार शस्त्राने कापला गळा

0
186

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालयमध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधित रुग्णाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिरज-मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे राहणार्‍या हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) यांना कोरोनाची लागण झाल्याची झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी 10 दिवसांपूर्वी मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मध्यरात्री त्यांनी चाकूने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली, असं मोमीन यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आत्महत्येबाबत मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची शिवसेनेला विनंती

“नवीन कात्रज बोगद्याजवळ बंदुकीचा धाक दाखवून डाॅक्टर दाम्पत्त्यांना लुटले”

भाजप शिवसेनासोबत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here