सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.
कोयनेतून आज दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा 10 ते 12 फुटाने अधिक वाढू शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”
महाराष्ट्रात पूरस्थिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…
मोठी बातमी! खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 42 फुटांवर जाण्याची शक्यता