रत्नागिरी : छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे योग्य निर्णय घेतील. निर्णय घेताना त्यांनी मराठा समाजाचा विचार करावा. स्वार्थ पाहू नका, असं आवाहन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं.
संभाजी छत्रपती यांना राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं ते मराठा समाजाचं नेतृत्व करावं म्हणून. त्यांचा सन्मान ठेवला गेला. त्यामुळे त्यांनी आता मराठा समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. त्यांची भूमिका काही दिवसात बदलते. ते योग्य नाही. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून ते योग्य निर्णय घेतील. पण निर्णय घेताना त्यांनी मराठा समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका, असं आवाहन लाड यांनी केलं. प्रसाद लाड यांनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, संभाजी छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असल्याने मला त्यांचा अभिमान तसेच त्यांच्याबद्दल आदर आहे. तसेच तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हांला मान्य असेल., असंही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…अन्यथा 7 जूनपासून रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार- छत्रपती संभाजीराजे
“चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?”
खासदार छत्रपती संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार?; सोशल मीडियात जोरदार चर्चा
चंद्रकांतदादांना स्वप्नं बघण्याचा छंद; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला