Home महाराष्ट्र साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

साकीनाका बलात्कार प्रकरण! पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

मुंबई :  साकीनाका येथील बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल. तसेच पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासन त्यांच्या संगोपनाची पुरेपूर काळजी घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

साकीनाका बलात्कारप्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मुंबईत आला होता. या आयोगाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावून घेतले आणि त्यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान, सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या घडामोडी –

कृष्णा नदीची पाणी पातळी उद्या 33 ते 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात FIR दाखल करणार- हसन मुश्रीफ

“काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

“किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या मालिका सुरूच, हसन मुश्रीफांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”