साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- जयंत पाटील

0
318

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेत पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पीडितेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, सदर संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लक्ष ठेवून असून पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही”

शिवसेनेसोबत राहिल्यास काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार; अब्दुल सत्तार यांचा सल्ला

“जतमध्ये काँग्रेसला खिंडार, अनेक मोठ्या नेत्यांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

किरीट सोमय्या टाकणार बॉम्ब; राष्ट्रवादीचा मंत्री आणि शिवसेनेचा नेता सोमय्यांच्या रडारवर, ते दोन नेते कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here