“साकीनाका निर्भया बलात्कार कांड; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना”

0
368

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयासारखा प्रकार घडला. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली.

या धक्कादायक घटनेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची महत्वाची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे. जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

दरम्यान, मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

“गुजरातच्या राजकीय वर्तकुात भूकंप, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here