मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यानंतर त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या चित्रकूट बंगल्यावर कार्यकर्त्यांची रीघ लागली. यावरुन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.
साहेबांनी मोठे युद्ध जिंकले, फार मोठे संकट देशावर आणि महाराष्ट्रावर येणार होतं ते भाऊंनी परतून लावले म्हणून कार्यकर्ते एकत्र आले. आपल्या योध्याचं अभिनंदन करण्यासाठी, असं म्हणत निलेश राणेंनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, मराठी मीडियाला मानलं पाहिजे त्यांनी ठरवलं तर चॅप्टर केस सुद्धा देशभक्तीची केस करतील, असंही निलेश राणे म्हणाले.
साहेबांनी मोठे युद्ध जिंकले, फार मोठे संकट देशावर आणि महाराष्ट्रावर येणार होतं ते भाऊंनी परतून लावले म्हणून कार्यकर्ते एकत्र आले, आपल्या योध्याचं अभिनंदन करण्यासाठी. मराठी मीडियाला मानलं पाहिजे त्यांनी ठरवलं तर चॅप्टर केस सुद्धा देशभक्तीची केस करतील. https://t.co/v1hox2tpJI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 22, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांना आता उत्तर मिळालं असेल”
“एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”
… म्हणून मी तक्रार मागे घेतेय; रेणु शर्मांचा मोठा खुलासा