मुंबई : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने 36, काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 1 आणि एम आय एम 1 असे उमेदवार विजयी झाले आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
आज बेळगाव महापालिकेवर “भगवा” फडकला .. उद्या तोच “भगवा” मुंबई महापालिकेवर वर फडकणारच, असं विश्वास नितेश राणे यांनी ट्विट करत व्यक्त केला.
आज बेळगाव महापालिकेवर “भगवा” फडकला ..
उद्या तोच “भगवा” मुंबई महापालिकेवर वर फडकणारच !!!— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2021
दरम्यान, दरम्यान, आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामुहिक बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या 8 जणांना बेड्या
जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे?; राम कदम यांचा सवाल
मोठी बातमी! करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी
बेळगावमध्ये भाजपने रचला इतिहास; महापालिकेवर भाजपचा झेंडा