Home महाराष्ट्र “सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय”

“सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय”

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपाकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं असून, विधिमंडळ अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटले आहेत. अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या मनसुख हिरण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

मनसुख हिरण प्रकरणामुळे चर्चेत आलेले सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटलांची टीका

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही “

“रंगीला गर्ल तब्बल 12 वर्षांनी करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण”

नागपुरमध्ये भाजपला खिंडार; 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश