पुणे : शेतकरी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर व भारतरत्न सचिन तेंडुलकरने भाष्य केलं होतं. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असं सचिननं म्हटलं होतं. यावर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मास्टर ब्लास्टर व भारतरत्न सचिन तेंडुलकर हा भाजप सरकारचा दलाल आहे, असं म्हणत संतोष शिंदे यांनी सचिनवर हल्लाबोल केला आहे. जर शेतकऱ्याने पेरलंच नाही तर ही सेलिब्रेटी मंडळी काय खाणार आहेत, असा प्रश्नही संतोष शिंदेंनी यावेळी केला आहे. तसेच सचिनचा भारतरत्न पुरस्कार काढून घेतला पाहिजे, असंही संतोष शिंदेंनी यावेळी मागणी केली.
दरम्यान, या बांधावरुन त्या बांधावर शेतकरी रोज हजारो रन्स काढतो. मातीत सोनं पेरुन सोन्यासारखं पीक काढतो. याची कुठे नोंद नाही. सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आज खऱ्या खर्थाने उभा राहण्याची गरज असताना तो शेतकरी विरोधी वक्तव्य करत असल्याचं संतोष शिंदे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार
आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“तात्या विंचूला जीवनदान देणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड”