सचिन सावंत यांनी केली ‘टिकटॉक’ स्टाईलने फडणवीसांवर टीका

0
464

मुंबई : सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकासआघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यावरच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी TikTok व्हिडिओ प्रमाणे उत्तर देत फडणवीसांची निशाणा साधला आहे.

TikTok वर एक ट्रेंड सध्या धुमाकूळ घालत आहे. यामध्ये तरूण आणि तरूणींचा ग्रुप एकत्र येऊन “आला वारा गेला वारा…उडून गेला…” असं म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन लाडाने साद घालतात.

‘महाविकासआघाडीची तुलना ही ऑटो रिक्षासोबत केली आहे. त्यामुळे हे फार काळ चालेल असं वाटत नाही’, अशी टीका फडणवीसांनी केली होती. यावर ‘गेली सत्ता…गेले सरकार, जीव झाला कासावीस…अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस? असं म्हणत सचिन सावंत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांनी ट्वीट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती मी समजू शकतो- जयंत पाटील

-मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार नारज; राजीनामा देणार असल्याच्या चर्चा

-वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवलं- देवेंद्र फडणवीस

-“भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळून लावला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here