आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकीत साबणे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला गेला. मात्र सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने हुंदका दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असून भाजपाकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तारक मेहता का उल्टा चष्मातील नट्टू काका यांचं निधन
शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक सल्ला
माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनांचा हात; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; देगलूरसाठी शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपकडून उमेदवारी