“रसेल द मसल शो; आंद्रे रसेलच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर KKR चा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय”

0
529

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने पंजाबचा 6 विकेट्स राखत पराभव करत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं.

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टाॅस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 18.2 षटकात केवळ 137 धावाच करू शकला. पंजाबकडून विकेटकीपर फलंदाज भानुका राजपक्षेनं तुफान आक्रमक फलंदाजी करताना केवळ 9 चेंडूत 31 धावांची विस्फोटक खेळी केली. राजपक्षेने आपल्या या खेळीत 3 चाैकार व 3 षटकारांची बरसात केली. तर कोलकाताकडून उमेश यादवने 4, टीम साऊथीने 2, तर सुनील नारायण, शिवम मावी व आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 विकेच घेतली.

हे ही वाचा : आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना कोलकाताने आपल्या 4 विकेट्स केवळ 51 धावांवर गमावल्या. नंतर आलेल्या सॅम बिलिंग्स व रसेल द मसेलने नाबाद विस्फोटक खेळी करत कोलकाताला एकहाती विजय मिळवून दिला. कोलकाताकडून आंद्रे रसेलनं सर्वाधिक 31 चेेंडूत नाबाद 70 धावांची वेगवान खेळी केली. रसेलच्या या खेळीत 2 चाैकार व 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने 15 चेंडूत 26 धावा केल्या. तर सॅम बिलिंग्सने 23 चेंडून नाबाद 24 धावा केल्या. तसेच कोलकाताने हा सामना 14.3 षटकातच जिंकला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘हा’ मोठा नेता पुन्हा स्वगृही परतला”

नवाज शरीफ, जीव वाचविण्यासाठी मोदींना लपून भेटले; इम्रान खान यांचा धक्कादायक आरोप

ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा भाजपला इशारा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here