मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने सीबीआयनं छापा टाकला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे.
लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असे चाकणकर यांनी म्हटलं आहे.
लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 24, 2021
दरम्यान, तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”
“शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ जाहीर”
केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील