आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. रूपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हे ही वाचा : नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही- गुलाबराव पाटील
रूपाली पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान, राष्ट्रवादीतील एक मोठी व्यक्ती नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
हे ही वाचा : नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही- गुलाबराव पाटील
रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या नाराज असल्याचं दिसून आलं. रूपाली चाकणकर यांनी रूपाली पाटील यांचं स्वागतही केलं नाही. तसेच त्यांना शुभेच्छा देखील दिल्या नाहीत.
दरम्यान, त्यामुळे आता राष्ट्रवादीत रूपाली चाकणकर विरूद्ध रूपाली पाटील असा सामना पहायला मिळणार का?, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
बेस्टच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून सत्ताधाऱ्यांचा पळ; भाजपाचा शिवसेनेवर निशाणा
“माझे महात्मा गांधी फक्त आणि फक्त राज ठाकरे”