मुंबई : आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. ते ‘लोकसत्ता’ या वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे, हे मी अनुभवलं आहे. कारण काँग्रेस पक्षाचंही महत्त्व टिकलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगलं स्थान दिलं गेलं पाहिजे. दोहोंचा समन्वय घडवून हे सरकार चालवलं जातं. मी त्याचा अनुभव घेतला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
मी मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला कंट्रोल केलं असं म्हणणार नाही. मात्र मी काँग्रेसचं संख्याबळ टिकवण्याचं, पक्षाला बळकटी आणण्याचं काम केलं, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हण
दारू विक्रीच्या परवानगीवरुन आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले…
राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे
…जर आघाडी तुटली नसती तर भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसती- पृथ्वीराज चव्हाण