Home पुणे राज्य पुण्यातून चालवा अथवा… ; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचलं

राज्य पुण्यातून चालवा अथवा… ; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचलं

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात  चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचलं आहे.

अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुण्यात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना डिवचलं आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

अजितदादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. हे मंत्री 11 वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. अजितदादांवर कामाचा लोड आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील. लोकांच्या समस्या अधिक वेगाने आणि लवकर सुटतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“देवों का देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण”

पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत- निलेश राणे

महाविकासआघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय- प्रवीण दरेकर