राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी दाैड कायम; कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सनी मात

0
212

दुबई : आजच्या आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेटेसनी पराभव केला.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावत केवळ 84 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून कर्णधार इयाॅन माॅर्गनने सर्वाधिक 34 चेंडूत 30 धावा केल्या. तर लाैकी फर्ग्युसनने 16 चेडंत 19 धावा केल्या. बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने 3, तर युझवेंद्र चहलने 2, तर नवदिप सैनी व वाॅशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने हे लक्ष्य केवळ 13.3 षटकात 2 गडी गमावत पूर्ण केले. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने 17 चेंडूत 25 धावा, फिंचने 21 चेंडूत 16 धावा, गुरकीरत सिंगने नाबाद 26 चेंडूत 21 धावा तर विराट कोहलीने नाबाद 17 चेंडूत 19 धावा केल्या. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून लाैकी फर्ग्युसनने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार”

मोहम्मद सिराज-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी: कोलकाताचे आरसीबीसमोर 85 धावांचे लक्ष्य

“…म्हणून प्रविण दरेकर यांना झाले अश्रू अनावर”

नाथाभाऊंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here