राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची गाडी सुसाट; कोलकाता नाईट रायडर्सवर 82 धावांनी मात

0
175

दुबई : राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव केला.

आजच्या या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट गमावत 194 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून फिंच 37 चेंडूत 47 धावा, देवदत्त पडीक्कल 23 चेंडूत 32 धावा, विराट कोहली 28 चेंडूत 33 धावा, तर ए.बी. डिव्हीलियर्सने 33 चेंडूत 73 धावा केल्या. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल व प्रसिद्ध कृष्णाने  प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावत 112 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने 25 चेंडूत 34 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने 10 चेंडूत 16 धावा, राहूल त्रिपाठीने 22 चेंडूत 16 धावा केल्या. बेंगलोरकडून वाॅशिंग्टन सुंदर व ख्रिस माॅरिसने 2, तर नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व ईशूरू उडाणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, जे कधी नाही ते सगळ होत आहे- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here