Home क्रीडा “राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये राॅयल चैलेंजर्सचा...

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये राॅयल चैलेंजर्सचा विजय

दुबई : आयपीएलच्या आजचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये  धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये 7 धावा केल्या. हे आव्हान राॅयल चैलेंजर्सने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 विकेट गमावून 201 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने 40 चेंडूत 54 धावा, फिंचने 35 चेंडूत 52 धावा, तर शेवटच्या षटकात ए.बी.डिव्हीलियर्सने 24 चेंडूत 55 धावा केल्या. तर शिवम दुबेने 10 चेंडूत 27 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 तर राहूल चहरने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात केवळ 8 धावांवर आऊट झाला. रोहितला वाॅशिंग्टन सुंदरने आऊट केले. नंतर आलेला सुर्यकूमार यादवही शून्यावर आऊट झाला. नंतर डिकाॅक व ईशान किशनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण डिकाॅकला युजवेंद्र चहलने सबस्टिट्यूट फिल्डर पवन नेगीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे 7 षटकात मुंबईची धावसंख्या 3 बाद 41. नंतर ईशान किशन व हार्दिक पांड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक आऊट झाला. त्याला अॅडम जैम्पाने आऊट केले. पण ईशान किशन अजूनही मैदानात होता. याचदरम्यान ईशान किशनने जैम्पाला षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. ईशान किशन व पोलार्डने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ईशानने 58 चेंडूत 99 धावा केल्या. तो शेवटच्या षटकात ईशान आऊट झाला. शेवटच्या चेंडूत 5 धावांची गरज असताना पोलार्डने चाैकार मारत सामना टाय केला. पोलार्डने 24 चेंडूत 60 धावा केल्या.

दरम्यान, राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून ईशूरू उडाणा, युझवेंद्र चहल, अॅडम जैम्पा व वाॅशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

ए.बी.डिव्हीलियर्सचे शानदार अर्धशतक; RCB च्या 201 धावा

सांगलीत कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या; धारधार शस्त्राने कापला गळा

शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची शिवसेनेला विनंती

“नवीन कात्रज बोगद्याजवळ बंदुकीचा धाक दाखवून डाॅक्टर दाम्पत्त्यांना लुटले”