Home क्रीडा रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे...

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे लक्ष्य

मुंबई : आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 195 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 54 चेंडूत 80 धावा केल्या. ज्यात त्याने 3 चाैकार व 6 षटकार मारले तर सुर्यकूमार यादवने 28 चेंडूत 47 धावा केल्या. यात 6 चाैकार व 1 षटकाराचा समावेश होता.

दरम्यान, कोलकाताकडून शिवम मावीने 2 विकेट्स घेतल्या. तर आंद्रे रसेल व सुनिल नारायणने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

कलानगरचे पाणी ओसरते मग मुंबईचे का नाही?; आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

“अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण”

मला प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद; संजय राऊतांचा कंगणा रणाैतला टोला