“कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांचं वर्चस्व, तब्बल 47 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात”

0
1216

कर्जत : कर्जत तालुक्यात पार पडलेल्या एकूण 56 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी दावा केला आहे.

56 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 47 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावत आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिला आहे, असा दावा नितीन धांडे यांनी केला आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी मतदार संघात असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून दिला. कुकडी-सिनाचा पाणीप्रश्न, बस डेपो, भू-संपादन, रखडलेला पीक विमा आदी मोठ्या प्रश्नांची सोडवणूक करत आपल्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यातून शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून दिला, असंही नितीन धांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

शरद पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब- गोपीचंद पडळकर

हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ही माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे- पंकजा मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here