रोहित पवारांना मंत्रिपद द्या; पक्षातील तरुणांचं शरद पवारांना पत्र

0
512

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद देण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षातील तरुण करत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे.

रोहित पवार आम्हा युवकांचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावं. युवकांच्या संदर्भात रोहित पवार यांचे काम मोठे आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावं आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा, असं या पत्रात लिहलं आहे.

कुणाला मंत्रिपद द्यायचं किंवा कुणाला नाही याचे सर्वाधिकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना राकेश कोते पाटील यांनी पत्र लिहलं आहे.

दरम्यान, राकेश कोते पाटील यांनी लिहलेल्या पत्रावर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-‘या’ कारणामुळे दिपीका पुन्हा झाली भावूक

-गृहखातं राष्ट्रवादीला देऊ नका नाहीतर… चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला प्रेमाचा सल्ला

-भारताशी युद्ध करण्यासाठी आमचं सैन्य तयार- इम्रान खान

-भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here