आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या आधी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिकामी आहे. त्यामुळे आता या जागी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळण्याची संधी आहे. मात्र, रोहित पवार यांना नेमकं कोणतं खातं मिळणार? याबाबत अजून काही ठोस माहिती मिळालेली नाही.
हे ही वाचा : “…तर भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या बाता कुणी करू नयेत”
दिलीप वळसे पाटील यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आधी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क हे खातं रिकामं आहे. तसचं कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याने अहमदनगरचे पालकमंत्रीपद घेण्यास हसन मुश्रिफ यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एका जागी रोहित पवारांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अखेर कंगणाला माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी आणि…; पहा व्हिडिओ
पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार- देवेंद्र फडणवीस
ठाण्यात 2 दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का; नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश