Home महाराष्ट्र रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीत वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे. यावरून आता भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वत:च महत्त्व वाढवण्यासाठी असे आरोप केले जात असतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. फडणवीसांनी काल दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच या भेटीनंतर मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मान्यता देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : “हायकमांडचा आदेश शिंदे गटाने धुडकावला; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहीत पवार म्हणाले आहेत. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“अंधेरीची निवडणूक ‘राज ठाकरेंनी’ एकहाती जिंकली”

शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ

आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…