“रोहित जी, आपण सर्व मिळून या संकटात रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करूया, परंतु नियमांचे पालन करूनच”

0
403

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सदेखील केला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार जी,मतदारसंघातील सर्वांना कुटुंब समजून आपण त्यांची सेवा करता,हे उत्तमच!त्याविषयी आक्षेप किंवा शंका नाही. पण राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी रुग्णांची जमेलतशी सेवा करीत आहेतच. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणं,ही तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल , असं दरेकरांनी म्हटलं.

जे चूक, ते चूकच असते. मग तो कोणीही असो! दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोटे असतात, एव्हढेच ‘रोहित’ जी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आपल्या चांगल्या कामाबद्दल कौतुकच आहे. पण, नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. मग तो तुमच्या पक्षाचा नेता असो वा अन्य कोणत्या!, असंही दरेकर यावेळी म्हणाले.

रोहित जी, तुम्ही, आम्ही, सारे मिळून या संकटात सदा सर्वकाळ सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करूया, परंतु नियमांचे पालन करूनच!, असं दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…तर रोहित पवारांना कोव्हिड सेंटरमध्ये नाचायची परवानगी कशी?

“…हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन, ठाकरे सरकार फक्त ज्योतिषीसारखे तारखा देत आहेत”

“इम्तियाज जलील ब्लॅकमेलिंगचं काम करतो, तो दुकाने उघडायला आला तर त्याला शिवसैनिक उत्तर देतील”

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here