रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो; थुकरटवाडीच्या सेटमध्ये पंकजा मुंडेंचा टोला

0
1709

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर आता राजकीय वारे वाहताना दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार भाजप खासदार सुजय विखे यांनी मंचावर हजेरी लावली.

पंकजा मुंडे, रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या राजकीय नेत्यांसोबत ‘चला हवा येऊ द्या’चा विशेष भाग रंगला. नेहमी हसऱ्या-खेळत्या सेटवर नेते मंडळींच्या हजेरीमुळे राजकीय वातावरण तापणार की काय, अशी शंका होती. मात्र मिश्कील टोलेबाजीत हा भाग चांगलाच रंगला. त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला.

दरम्यान, सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत, असा टोमणा पंकजा मुंडेंनी मारला. यावर रोहित पवारांनी, “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं म्हणत पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज; इंटिमेट सीनचा धुमाकूळ

उद्या 11 डिसेंबर रोजी सर्व दवाखाने बंद राहणार; IMA ची राष्ट्रवादी बंदची हाक

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”

“रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन; शेतकरी आंदोलन करत असताना त्यांनी असं बोलायला नको होतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here