सत्तेत येण्याआधीच संजय राऊत यांना वेड लागलंय- रावसाहेब दानवे

0
164

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचा अनखी वढत चालला आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यांवर निशाणा साधला

भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागलं आहे. पण, आम्ही अनेक वेळा सत्तेत आलो. पण सत्तेत येण्याआधीच संजय राऊत यांना वेड लागलं आहे. काय बोलावं का बोलू नये हे त्यांना सूचत नाही. त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं, असं दानवे म्हणाले.

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे बोलत होते.

दरम्यान, भाजपचे आमदार मतदारसंघात आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार मात्र फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये आहेत. हॉटेल का बदलत आहेत हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही. आम्ही कोणत्याही आमदाराला धमकावलं नाही, असा दावाही दानवेंनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here