मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रियाच्या वकिलांनी रियाला जामीन देण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळून लावली आहे.
रियाचे वकील सतिश मानशिंदे यांनी, रियाने चौकशीत सर्वांना सहकार्य केलं असून याप्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेला नाही. एनसीबीने तिची चौकशी पूर्ण केली आहे, त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे, असं कोर्टात सांगितलं होतं. पण कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.
दरम्यान, रिया या प्रकरणातील आरोपी आहे त्यामुळे तिला जर जामीन मिळाला तर त्याचा परिणाम थेट या केसवर होऊ शकतो. रियाने सुशांतच्या अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे, म्हणून त्याच्यावर तपास करणं गरजेचं असल्याचं एनसीबीने कोर्टात सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मी घाबरणारही नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही; कंगणा रणाैतचा मुंबई प्रवासाआधी ट्विट
बाळासाहेब ठाकरेंचे हे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र
“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”