Home क्रीडा ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत...

ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विशाखापट्टणम : करो किंवा मरोच्या आजच्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 48 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपलं आवाहन जिवंत ठेवलं.

सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक हारून भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी जोरदार सलामी भागीदारी केली. ऋतुराज व ईशानने 10 षटकात 97 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना 35 चेंडूत 57 धावांची विस्फोटक खेळी केली. ऋतुराजने आपल्या खेळीत 7 चाैकार व 2 षटकार लगावला. तर किशनने 35 चेंडूत 54 धावांची खेळी केली. किशनने आपल्या या खेळीत 5 चाैकार व 2 षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने विस्फोटक खेळी करत 21 चेंडूत नाबाद 31 धावा करत भारताला 179 धावांपर्यंत पोहचवलं. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरिअयसने 2, तर कगिसो रबाडा, केशव महाराज व तबरेज शम्सीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 19.1 षटकात 131 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेन्ड्रीक्सने 20 चेंडूत 23, ड्वेन प्रिटोरिअयसने 16 चेंडूत 20, हेनरिच क्लासेनने 24 चेंडूत 29 धावा, तर वेन पार्नेलने 18 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. तर भारताकडून हर्षेल पटेलने 4, युझवेंद्र चहलने 3, तर अक्षर पटेल व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विेकेट घेतली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवार म्हणतात…

ठाण्यात राजकीय तणाव; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले