दुबई : आजच्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा 8 विकेट्सनी पराभव केला.
राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात गडी गमावत 145 धावा केल्या. बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 चेंडूत 50 धावा केल्या. तर ए.बी.डिव्हीलियर्सने 36 चेंडूत 39 धावा केल्या. तर चेन्नईकडून सॅम करनने 3, तर दीपक चहरने 2 तर मिचेल सॅन्टरने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना चेन्नईने हे लक्ष्य 15.4 षटकात केवळ 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद 45 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. तर अंबाती रायडूने 27 चेंडूत 39 धावा केल्या. तर बेंगलोरकडून ख्रिस माॅरिस व युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल”
राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर
ख्रिस जाॅर्डन-अर्शदिप सिंगची शानदार बाॅलिंग; पंजाबचा हैदराबादवर रोमांचक विजय
कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे