Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठी गंभीर बाब; नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली काळजी

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या देशासाठी गंभीर बाब; नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली काळजी

मुंबई : देश सध्या करोना विषाणूशी लढा देत आहेत. देशाच्या जवळपास सर्वच राज्यात करोनाचा कहर सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील”

“…तर महाराष्ट्राचं किती काैतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”

“वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे”

पुण्याची मस्तानी, चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला