मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातील प्रमुख गोविंदा पथकांसोबत बैठक पार पडली. त्यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला.
जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केलं.
दरम्यान, या बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनीदेखील या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या. सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत. सध्या प्रश्न आरोग्याचा आहे. आरोग्याचा विचार प्राधान्याने करावा लागेल.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
“नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या का झोंबल्या?”
14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ठ कसा?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल
महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा