नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. यावर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झालंय. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे. एका हाताने टाळी वाजत नाही, असं म्हणत छगन भुजबळांनी राज्यपालांना टोसा लगावला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाने दिलेल्या 12 विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेल नाही, असं भुजबळ म्हणाले. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री कार्यालय या दोघांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असल्याची गरज आहे, असंही भुजबळांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी
मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
“राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत, पण…”
“कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांचं वर्चस्व, तब्बल 47 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात”