“शरद पवारांच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील”

0
150

सोलापूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मंगळवेढ्यात सभा घेतली.

आज जयंत पाटील मंगळवेढ्यात सभेसाठी आले असताना या सभेला पावसानेही हजेरी लावली. मंगळवेढ्यात जयंत पाटील यांच्या सभेला पावसाने हजेरी लावल्यानंतर शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती यावेळी पाहायला मिळाली. पाऊस सुरू झाल्यानंतरही जयंत पाटील यांनी व्यासपीठ न सोडता आपली सभा आणि भाषण सुरूच ठेवलं. त्यानंतर त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूकीनिमित्ताने भगिरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. असं जयंत पाटलांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील, तर…- जयंत पाटील

…हे भाजपाचे राजकारण नाही तर काय सुरू आहे – नवाब मलिक

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

…म्हणून भाजपनं 6 वेळा माझं तिकीट कापलं; अमित शहांनी केला मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here