“सांगलीत सैराट सिनेमाची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केला म्हणून तरूणाला भोसकलं”

0
356

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीत सैराट सिनेमात दाखवलेल्या घटनांची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये प्रेमविवाह केल्याचा रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी आता दोघा संशयितांनाही ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : “मनसेत इनकमिंगचा धुमधडाका, भांडूप येथील शेकडो नागरिकांनी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत केला मनसेत प्रवेश”

सांगलीच्या मिरजेतील सुभाष नगर बारगाले प्लॉट याठिकाणी प्रेम विवाह केल्याच्या रागातून योगेश चंद्रकांत लवाटे या 28 वर्षाच्या तरुणावर गुरुवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येत योगेशवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर योगेशच्या मित्रांनी त्याला लगेज खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. म्हणून योगेशचा जीव थोडक्यात वाचला.

दरम्यान, या प्रकरणी योगेशच्या काकीनं पोलिसांत या हल्ल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोकण दाैऱ्यावर”

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“गोव्यात शिवसेना सुसाट, ‘या’ प्रसिद्ध फुटबाॅलपटूनं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here