राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
167

मुंबई : राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी राज्यातंर्गत प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सूचना दिलेल्या असूनही राज्य सरकारने याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही, असं माधव भांडारी यांनी निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ई पास पूर्णपणे बंद करावा, स्थानिक प्रशासनाला याबाबतीत दिलेले अधिकार काढून घ्यावेत, राज्यातील शेतकरी व छोटे उद्योजक यांचे व्यवहार सुरू करण्यासाठी मदतीच्या योजना राबवाव्यात व ते नीट चालावेत यासाठी भ्रष्टाचार रोखण्याला प्राधान्य द्यावे अशा चार प्रमुख मागण्या माधव भांडारी यांनी निवेदनात केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर

सचिन तेंडुलकरचा ‘हा’ रेकॉर्ड फक्त विराट कोहलीच मोडू शकतो- इरफान पठाण

इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; दोषींवर तत्काळ कारवाई- एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची बाधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here