मुंबई : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले. शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला. जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सह्याद्रीऐवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे, असा इशारा जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले,शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला,जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही.सह्याद्रीऐवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे. pic.twitter.com/b1nUsjShhb
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 12, 2020
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे मान्य आहे का? असा सवाल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तुम्हाला हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो काहीतरी बोला; संजय राऊत आक्रमक
जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ- नारायण राणे
फडणवीसांना नागपूर जिंकता आलं नाही आणि ते बारामतीच्या जिंकण्याच्या गोष्टी करतात