माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार- संजय राऊत

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.

ईडी म्हणजे भाजपसाठी एटीएम मशिन आहे, ईडीचे एक नेटवर्क देशातील खंडणी गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : शिवसेनेची मोठी खेळी; भाजप-राष्ट्रवादीच्या मतभेदात अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश

माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत. देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय स्टेटमेन्ट… ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार, असा इशारा राऊतांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“IPL 2022 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ आक्रमक गोलंदाज आयपीएल खेळणार नाही”

“केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”

आता मनसेकडूनही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी; कोकण भवन कार्यालयासोमर काढला भव्य मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here