मुंबई : आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला आणि भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संविधान बचावचे नारे देणारेचं संविधानाचा….लोकशाहीचा गळा घोटत आहेत…१२ जणांचं निलंबन करून मुस्कटदाबी चालवलीये…राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा…, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारला इशारा दिला.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना-भाजपचं नातं आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखं- संजय राऊत
शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल
“विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”
“31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केलेली घोषणा फसवी”