मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
विजय वडेट्टीवार हे सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनला गेल्या 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
धक्कादायक! मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू
“धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली”
कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज
…नाहीतर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही- गोपीचंद पडळकर